Lyrics of Marathi song – Bawara ha jiv bawara (बावरा हा जीव बावरा) | kshanbhar vishranti movie | क्षणभर विश्रांती
चित्रपट : क्षणभर विश्रांती
दिग्दर्शक : सचित पाटील
कलाकार :भारत जाधव, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, कादंबरी कदम, शुभांगी गोखले, जयराज नायर, नितीन जाधव, मानवा नाईक, हेमंत ढोमे, मौलिक भट, पूजा सावंत
संगीतकार : ऋषिकेश कामेरकर
गीतकार : गुरु ठाकूर
वर्ष : २०१०
प्रेम रंगात रंगुनी, प्रीत झणकारते मनी
अंतरंगात ऐकू ये सादं होतसे जीव हा
बावरा हा जीव बावरा
ना तुला बोलवे, ना मला बोलवे
नयन हे बोलती एकमेकांसवे
धुंद गंधात न्हाउनी, गीत ये आकारुनी
अंतरंगात ऐकू ये सादं होतसे जीव हा
बावरा हा जीव बावरा
जीव आसावला, कंपने हि नवी
ऐकू येते उरी, स्पंदने हि नवी
स्वप्न डोळ्यात देखुनी, साज छेडीत ये कुणी
अंतरंगात ऐकू ये सादं होतसे जीव हा
बावरा हा जीव बावरा
Click here to download MP3 song of Bawara ha jiv bawara (बावरा हा जीव बावरा)
Tags: download, marathi, marathi lyrics, movie, songs
its very nice song.one of my favorite.
Yes its really beautiful song! Thanks Harshada for comments 🙂
this is thus found to be awsome………….. my goodness
Nice work