कंटाळा…
आज मला खच्चून आलाय कंटाळा
नको वाटतो जिव्हाळा अन
हा माणसांचा गोतावळा
आज मला खच्चून आलाय कंटाळा……… १.
कधी वाटते झटकून टाकावी
अंगावर चढलेली संस्काराची पुट
पण त्यान झालाय कोणाच आजवर भल? म्हणूनच……
आज मला खच्चून आलाय कंटाळा………२.
मनातला गोंधळ आणि गोंधळून गेलेले शब्द
गुंता ह्यांचा सोडवायचाय पण
त्याला व्हायचंच नाहीये मोकळ, मरू दे त्याला ….
आज मला खच्चून आलाय कंटाळा………३.
दुनियादारी शिकवणारी प्रवचन आणि
आशा दाखवणार सार तत्वज्ञान
करू काय त्याच….घालू लोणच? छे साला…
आज मला खच्चून आलाय कंटाळा………४.
ऋतू आले अन गेले, सारेच्या सारे एकसारखे….
पावसाळा काय अन काय उन्हाळा
कुठे मिळेना जीवाला गारवा, मरू दे ना….
आज मला खच्चून आलाय कंटाळा………५.
कसा जाईल हो हा कंटाळा?
काय करू काय…उपाय सांगा!
विचार तरी किती करावा…कारण त्याचाही,
आता मला खच्चून आलाय कंटाळा………..६
— शिरीन आरश
Tags: kavita, marathi


Nice poem!!!
It is dedicated to you only..Nikki 🙂 🙂
Nicely designed web page. Good collectio of marathi songs. Add some more.
Good luck
Good collection of Marathi songs.
जास्त शब्दांची रेलचेल न करता अशी असावी कविता…
अप्रतिम …. मला अश्या कविता किंवा पोस्ट मेल करा ( news.tejas@gmail.com ) … ज्या शब्दांची ताणाताण न करता लिहिल्या असतील.. please send me…