picture picture
November 30, 2011 Kavita / Poems 30 Comments

असं प्रेम करावं…

थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं
थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं
गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा “अरे” करावं
असं प्रेम करावं

जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं

कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं

वर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं

प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं,
पुन: त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं
असं प्रेम करावं

विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं ….
त्यासाठीच की आयुष्यात एकदा तरी प्रेमात पड़ाव…….

November 30, 2011 Kavita / Poems 3 Comments

विसरलोय मी…

विसरलोय मी….

विसरलोय मी…
तिची न माझी झालेली पहिली भेट
विसरलोय मी…
जी मनात बसली होती एकदम थेट

विसरलोय मी….
तिने त्या दिवशी घातलेला अबोली कलरचा ड्रेस
विसरलोय मी….
तेव्हाचे तिचे वार्यावर उडणारे काळे केस

विसरलोय मी….
सरळ मनावर वार करणारा तिचा एक कटाक्ष
विसरलोय मी….
तेव्हाची रिमझिम पावसाची साक्ष

विसरलोय मी….
तिच चिडून मला खडूस म्हणन
विसरलोय मी….
लटक्या रागात सुद्धा प्रेमान काळजी घेण

विसरलोय मी….
दोघांनी घेतलेला वाफाळलेला चहाचा कप
विसरलोय मी….
तिने दिलेलं चाफ्याचं रोप

विसरलोय मी….
मला सतवण्यासाठी तिच मुद्दाम अबोल राहण
विसरलोय मी….
मला बोलता बोलता निशब्द करण

विसरलोय मी….
आमच्यात भांडणाच, मैत्रीच, आणि …..प्रेमाचं बोलण झालेलं
.
.
.
आणि
विसरलोय मी….
तिने मला ” मला विसर ” म्हटलेलं….

November 30, 2011 Kavita / Poems 3 Comments

मला वाटतं…

मला वाटतं,
आयुष्य अगदी खासगी नोंदवहीसारखं असत.
जगात पहिल्यांदा डोळे उघडताना
वहीच पहिलं पान उघडतं
अगदी नवं कोर पान
त्यावर काळ्या शाईने अक्षर उमटतात
जशी मनःपटलावर ती कोरली जातात
वेळोवेळी नव्याने पानं उघडतं जातात
तशी नवी नवी अक्षर त्यावर उमटत जातात
आयुष्य सरत असतं…
काही पानं दुमडली जातात, परत कधीही न उघडण्यासाठी
तर काही पानांचे कोपरे दुमडले जातात, पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी
काही पानांत मोरपीस दडलेली असतात
तर काहींत जाळीदार सुकी पानं लपलेली असतात
काहीना सुवाच्य अक्षराची देणगी असते
तर काहींत अस्वस्थ मनाची कहाणी असते
पण काही पानं कोरीच राहतात
मुक्या आसवांचे त्यावर डाग असतात
आयुष्य सरत जात…
आणि पाहता पाहता शेवटच पान देखील मिटत
मिटलेल्या त्या पहिल्या आणि शेवटच्या पानात
सार रहस्य दडलेलं असतं
आयुष्य सरताच ते त्यात बंद होत
पुन्हा कधीही न उघडण्यासाठी
प्रत्येक आयुष्याच्या नोंदवहीत काहीतरी दडलेलं असतं

November 29, 2011 Kavita / Poems 0 Comments

मन चिंध्यांत फाटले…

मन चिंध्यांत फाटले
आता कशी मी सावरू
अश्रू नयनांत दाटले
त्यांना कसे रे आवरू?

प्रीतीचे हे गोड कुंपण
तू निर्दयपणे मोडले
प्रेमाचे या बंध अपुले
किती सहजपणे तोडले…

आर्त भाव या अंतरीचा
कसा डोळ्यांतून सांडला
प्रीतीचा हा डाव फसवा
असा शब्दांतून मांडला…

दुक्ख माझे झाले अबोल
मुकेपणी विनविते
वाहणाऱ्या अश्रूंत आज
भावनांना भिजवीते…

शपथ आहे तुला माझ्या
गुंतलेल्या स्पंदनांची…

November 29, 2011 Kavita / Poems 16 Comments

आज तुझी खूप आठवण आली…

आज तुझी खूप आठवण आली,
म्हणून मुद्दामच मोबाइल काढला,
तुझा जुना नंबर शोधून,
बंद असून सुद्धा एकदा तपासून पहिला,

नंबर अन अवेलेबल दाखवत होता,
इथे श्वास सारखा फुलत होता,
का माहित नाही कसतरीच झालेलं,
मनात सारखं काहीतरी चाल्लेल,

हो तिथेच गेलेलो मी,
जिथे पहिल्यांदा भेटलो होतो,
नजरेला नजरा देत,
एकत्र राहणार बोललो होतो,

तू मात्र निघून गेलीस,
पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण करतोय,
मी अजूनहि तुझी तिथेच वाट पाहतोय,
तू गेल्यावरही तू जवळ असल्याचा भास होतोय…