picture picture
November 11, 2011 Kavita / Poems 1 Comments

ती , मी आणि ती एक सायंकाळ …

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!
कधी ना विसरणारी ती
कधी ना विसरणारा मी
आणि पुष्टच्या आठवणीची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अखंड धरती ती
अनंत आकाश मी
आणि अस्पर्ष क्षितिजाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

न संपणारी रात्र ती
न संपणारा दिवस
मी आणि गर्द आसवांची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

स्वप्नातली राजकुमारी ती
स्वप्नातला राजकुमार मी
आणि खरया अस्तीत्वाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

जीवनाची राणी ती
मृत्यूचा राजा मी
आणि झुरणाऱ्या जीवांची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अर्धवट प्रेमिका ती
अर्धवट प्रेमी मी
आणि अर्धवट प्रेम कहाणीची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

दूर कुठेतरीची सुरवात ती
जवळचा अंत मी
आणि दोघांच्या मिलनाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!!….

Be Sociable, Share!
Tags: ,

One Response to “ती , मी आणि ती एक सायंकाळ …”

One Comment

  1. preeti says:

    nice ….keep it up

Leave a Reply to preeti

Name

Mail (will not be published)

Website