picture picture
November 29, 2011 Kavita / Poems 1 Comments

कॉलेज गारवा (College Garava)

College kavita study

Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो…
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो…
तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं….
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही….
तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते…
Semester मधले काही दिवस
नकळत चोरून नेते…
नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात…
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात…
पुन्हा हात चालू लागतात…
मन चालत नाही….
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही…
Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ…
चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
‘EXAM’s मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो…सो..च जातो??

November 29, 2011 Kavita / Poems 0 Comments

मन म्हणतो…

मन म्हणतो ती बागेतील फूल
मेंदू म्हणतो तू फुलपाखरू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो ती स्वर्ण मधु
मेंदू म्हणतो तू फार कडु
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो तिच्या मनात मी
मेंदू म्हणतो मी कसे मानू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो बोलेल ती
मेंदू म्हणतो जाऊन बोल तू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो बघ डोळ्यात तिच्या
मेंदू म्हणतो नको बघू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो तिचे डोळे गहिरे
मेंदू म्हणतो नको त्या नजरेत बुडु
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मनात तिच्या ओठातिल स्वर
मेंदू म्हणतो नको तिच्या तालावर नाचू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मनात उमटे गालावरची खळी
मेंदू म्हणतो नको तिच्या हसण्याला फसू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मनास हवा स्पर्श तिचा
मेंदू पाहतो मागे सरु
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मनात मझ्या प्रेमाची हिरवळ
मेंदूत मत्र शिशिर ऋतू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन पाहतो तिलाच स्वप्नी
मेंदू म्हणतो चल आता उठू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो वाट बघ
मेंदू म्हणतो बस आता निघू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?
.
.
… Ek Kavi

November 24, 2011 Marathi Songs, Music 0 Comments

Saang na re mana (सांग ना रे मना) Zenda – Video / MP3 download song

चित्रपट – झेंडा (२०१०)
गीत – गुरु ठाकूर
संगीत – अवधूत गुप्ते
स्वर – निहिरा जोशी, स्वप्नील बांदोडकर

Lyrics of song – Saang na re mana (सांग ना रे मना)

Video song –

Download Mp3 Song:

Click title to download – Saang Na Re Mana (Zenda) - सांग ना रे मना (5164)

November 24, 2011 Marathi Lyrics, Music 11 Comments

Lyrics of Marathi song – Antari wajate – Saang na re mana (अंतरी वाजती… सांग ना रे मना)

गीत – गुरु ठाकूर
संगीत – अवधूत गुप्ते
स्वर – निहिरा जोशी, स्वप्नील बांदोडकर
चित्रपट – झेंडा (२०१०)

अंतरी वाजती प्रितीची पैंजणे,
आणि धुंदावती भाबडी लोचने,
होतसे जीव का घाबरा सांग ना,
सांग ना रे मना.. सांग ना रे मना..

श्वास गंधाळती, शब्द भांबावती,
रोम रोमातली कंपने बोलती,
मोहरे मोहरे पाकळी पाकळी,
भारलेल्या जिवा आवरावे किती,
का अश्या जागल्या सांग संवेदना,
सांग ना रे मना..सांग ना रे मना..

हे नवे भास अन्‌ ह्या नव्या चाहुली,
ऐकू ये कोठुनी साद ही मलमली,
गोठले श्वास अन्‌ स्पंदने थांबली,
हे शहारे जणु रेशमाच्या झुली,
आज ओथंबल्या का अश्या भावना,
सांग ना रे मना…सांग ना रे मना…

Click here to download MP3 song of Saang na re mana (सांग ना रे मना)

November 11, 2011 Kavita / Poems 1 Comments

ती , मी आणि ती एक सायंकाळ …

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!
कधी ना विसरणारी ती
कधी ना विसरणारा मी
आणि पुष्टच्या आठवणीची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अखंड धरती ती
अनंत आकाश मी
आणि अस्पर्ष क्षितिजाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!