picture picture
November 30, 2011 Kavita / Poems 3 Comments

मला वाटतं…

मला वाटतं,
आयुष्य अगदी खासगी नोंदवहीसारखं असत.
जगात पहिल्यांदा डोळे उघडताना
वहीच पहिलं पान उघडतं
अगदी नवं कोर पान
त्यावर काळ्या शाईने अक्षर उमटतात
जशी मनःपटलावर ती कोरली जातात
वेळोवेळी नव्याने पानं उघडतं जातात
तशी नवी नवी अक्षर त्यावर उमटत जातात
आयुष्य सरत असतं…
काही पानं दुमडली जातात, परत कधीही न उघडण्यासाठी
तर काही पानांचे कोपरे दुमडले जातात, पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी
काही पानांत मोरपीस दडलेली असतात
तर काहींत जाळीदार सुकी पानं लपलेली असतात
काहीना सुवाच्य अक्षराची देणगी असते
तर काहींत अस्वस्थ मनाची कहाणी असते
पण काही पानं कोरीच राहतात
मुक्या आसवांचे त्यावर डाग असतात
आयुष्य सरत जात…
आणि पाहता पाहता शेवटच पान देखील मिटत
मिटलेल्या त्या पहिल्या आणि शेवटच्या पानात
सार रहस्य दडलेलं असतं
आयुष्य सरताच ते त्यात बंद होत
पुन्हा कधीही न उघडण्यासाठी
प्रत्येक आयुष्याच्या नोंदवहीत काहीतरी दडलेलं असतं

November 29, 2011 Kavita / Poems 0 Comments

मन चिंध्यांत फाटले…

मन चिंध्यांत फाटले
आता कशी मी सावरू
अश्रू नयनांत दाटले
त्यांना कसे रे आवरू?

प्रीतीचे हे गोड कुंपण
तू निर्दयपणे मोडले
प्रेमाचे या बंध अपुले
किती सहजपणे तोडले…

आर्त भाव या अंतरीचा
कसा डोळ्यांतून सांडला
प्रीतीचा हा डाव फसवा
असा शब्दांतून मांडला…

दुक्ख माझे झाले अबोल
मुकेपणी विनविते
वाहणाऱ्या अश्रूंत आज
भावनांना भिजवीते…

शपथ आहे तुला माझ्या
गुंतलेल्या स्पंदनांची…

November 29, 2011 Kavita / Poems 16 Comments

आज तुझी खूप आठवण आली…

आज तुझी खूप आठवण आली,
म्हणून मुद्दामच मोबाइल काढला,
तुझा जुना नंबर शोधून,
बंद असून सुद्धा एकदा तपासून पहिला,

नंबर अन अवेलेबल दाखवत होता,
इथे श्वास सारखा फुलत होता,
का माहित नाही कसतरीच झालेलं,
मनात सारखं काहीतरी चाल्लेल,

हो तिथेच गेलेलो मी,
जिथे पहिल्यांदा भेटलो होतो,
नजरेला नजरा देत,
एकत्र राहणार बोललो होतो,

तू मात्र निघून गेलीस,
पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण करतोय,
मी अजूनहि तुझी तिथेच वाट पाहतोय,
तू गेल्यावरही तू जवळ असल्याचा भास होतोय…

November 29, 2011 Kavita / Poems 1 Comments

कॉलेज गारवा (College Garava)

College kavita study

Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो…
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो…
तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं….
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही….
तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते…
Semester मधले काही दिवस
नकळत चोरून नेते…
नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात…
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात…
पुन्हा हात चालू लागतात…
मन चालत नाही….
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही…
Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ…
चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
‘EXAM’s मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो…सो..च जातो??

November 29, 2011 Kavita / Poems 0 Comments

मन म्हणतो…

मन म्हणतो ती बागेतील फूल
मेंदू म्हणतो तू फुलपाखरू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो ती स्वर्ण मधु
मेंदू म्हणतो तू फार कडु
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो तिच्या मनात मी
मेंदू म्हणतो मी कसे मानू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो बोलेल ती
मेंदू म्हणतो जाऊन बोल तू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो बघ डोळ्यात तिच्या
मेंदू म्हणतो नको बघू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो तिचे डोळे गहिरे
मेंदू म्हणतो नको त्या नजरेत बुडु
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मनात तिच्या ओठातिल स्वर
मेंदू म्हणतो नको तिच्या तालावर नाचू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मनात उमटे गालावरची खळी
मेंदू म्हणतो नको तिच्या हसण्याला फसू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मनास हवा स्पर्श तिचा
मेंदू पाहतो मागे सरु
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मनात मझ्या प्रेमाची हिरवळ
मेंदूत मत्र शिशिर ऋतू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन पाहतो तिलाच स्वप्नी
मेंदू म्हणतो चल आता उठू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?

मन म्हणतो वाट बघ
मेंदू म्हणतो बस आता निघू
तू तर जाशील निघून दूर
मग मी कसा जगू ?
.
.
… Ek Kavi