picture picture
December 20, 2011 Kavita / Poems 1 Comments

I wish…

I like it when you smile, but I love it more when I am the reason.

I want to find the strength
And the courage To tell you
What you really mean to me.

I have tried so many times to tell you
And try to find the words to say
But they don’t come to me that easy
And there is also always that question

November 30, 2011 Kavita / Poems 2 Comments

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे……… कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,

म्हणुन………………..म्हण

मी हल्ली बोलतच नाही

November 30, 2011 Kavita / Poems 6 Comments

आपण उगाचच मोठे झालो…

कधी अस वाटतं कि
आपण उगाचच मोठे झालो !
रम्य ते बालपण सोडून
उगाच तारुण्याच्या कवेत आलो !!

… तूटलेले मन आणि
अपुर्ण स्वप्न यापेक्षा,
तूटलेली खेळनी आणि
अपुर्ण गृहपाठच बरा होता !!

BOSSचा ओरडा आणि
WORK LOAD यापेक्षा,
बाईँच्या छड्या आणि
क्षणभंगुर रागच बरा होता !!

PROJECT FILE आणि
PRESENTATIONचा धाक यापेक्षा,
चिञकलेची वही आणि
भाषनाची स्पर्धाच बरी होती !!

प्रेस केलेला FORMAL आणि
SUITABLE TIE यापेक्षा,
चुरगळलेला गणवेश आणि
सुटलेली बूठाची लेसच बरी होती !!

OFFICEची भरगच्च BAG
आणि LAPTOP यापेक्षा,
अर्धवट भरलेली WATERBAG आणि
शाळेच दप्तरच बर होतं !!

रजेच APPLICATION आणि
LIVEसाठीचा FORM यापेक्षा,
शाळेला मारलेली दांडी आणि
आजारपणाच नाटकच बर होतं !!

CAFETERIAमधल जेवन
आणि थंडगार COLDRINK यापेक्षा,
डब्याच रींगन आणि
बर्फाचा गोळाच बरा होता !!

घड्याळाचे वेध आणि
कामावरुन वेळ यापेक्षा,
वंन्दे मातरमचे बोल आणि
शाळेचा घंटानादच बरा होता !!

खरचं ! आता अस वाटत कि
आपण उगाचच मोठे झालो !
रम्य ते बालपण सोडून
उगाच तारुण्याच्या कवेत आलो !!

November 30, 2011 Kavita / Poems 30 Comments

असं प्रेम करावं…

थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं
थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं
गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा “अरे” करावं
असं प्रेम करावं

जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं

कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं

वर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं

प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं,
पुन: त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं
असं प्रेम करावं

विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं ….
त्यासाठीच की आयुष्यात एकदा तरी प्रेमात पड़ाव…….

November 30, 2011 Kavita / Poems 3 Comments

विसरलोय मी…

विसरलोय मी….

विसरलोय मी…
तिची न माझी झालेली पहिली भेट
विसरलोय मी…
जी मनात बसली होती एकदम थेट

विसरलोय मी….
तिने त्या दिवशी घातलेला अबोली कलरचा ड्रेस
विसरलोय मी….
तेव्हाचे तिचे वार्यावर उडणारे काळे केस

विसरलोय मी….
सरळ मनावर वार करणारा तिचा एक कटाक्ष
विसरलोय मी….
तेव्हाची रिमझिम पावसाची साक्ष

विसरलोय मी….
तिच चिडून मला खडूस म्हणन
विसरलोय मी….
लटक्या रागात सुद्धा प्रेमान काळजी घेण

विसरलोय मी….
दोघांनी घेतलेला वाफाळलेला चहाचा कप
विसरलोय मी….
तिने दिलेलं चाफ्याचं रोप

विसरलोय मी….
मला सतवण्यासाठी तिच मुद्दाम अबोल राहण
विसरलोय मी….
मला बोलता बोलता निशब्द करण

विसरलोय मी….
आमच्यात भांडणाच, मैत्रीच, आणि …..प्रेमाचं बोलण झालेलं
.
.
.
आणि
विसरलोय मी….
तिने मला ” मला विसर ” म्हटलेलं….