picture picture
August 12, 2012 Kavita / Poems 7 Comments

एखादा क्षण असाही येतो

एखादा क्षण असाही येतो

एखादा क्षण असाही येतो
मोहरून मनाला,
शहारून जातो..
एखादा क्षण असाही येतो
हुरहूर लावून एकांत देतो..
एखादा क्षण असाही येतो
विजयाचा आनंद देऊन जातो..
एखादा क्षण असाही येतो
वेदनेची झाल पांघरून जातो..
एखादा क्षण असाही येतो
आभाळ कवेत भरून जातो..
एखादा क्षण असाही येतो
मनाचा गाभारा रिता होतो..
एखादा क्षण असाही येतो
हास्याचे कारंजे फुलवून जातो..
एखादा क्षण असाही येतो
काहूर माजवून रडवून जातो..
एखादा क्षण असाही येतो
सुगंध कस्तुरीचा दरवळून जातो..
एखादा क्षण असाही येतो
बहर फुलांचे टाळून जातो..
एखादा क्षण असाही येतो
रंगांचे ऋतू सांडून जातो..
एखादा क्षण असाही येतो
पाकळ्या मनाच्या गाळून जातो…

February 5, 2012 Kavita / Poems, Shayari 0 Comments

दिलों में तुम अपनी…

दिलों में तुम अपनी  बेताबियाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुमLife - Zindagi

नज़र में ख्वाबों की
बिजलियाँ लेके चल रहे हो
तो ज़िंदा हो तुम

हवा के झोकोन के जैसे
आज़ाद रहनो सीखो
तुम एक दरिया के जैसे
लहरों में बहना सीखो
हर एक लम्हे से तुम मिलो
खोले अपनी बाहें
हर एक पल एक नया समा
देखें यह निगहाएँ

January 29, 2012 Kavita / Poems 5 Comments

कंटाळा…

आज मला खच्चून आलाय कंटाळा
नको वाटतो जिव्हाळा अन
हा माणसांचा गोतावळा

आज मला खच्चून आलाय कंटाळा……… १.

कधी वाटते झटकून टाकावी
अंगावर चढलेली संस्काराची पुट
पण त्यान झालाय कोणाच आजवर भल? म्हणूनच……

आज मला खच्चून आलाय कंटाळा………२.

मनातला गोंधळ आणि गोंधळून गेलेले शब्द
गुंता ह्यांचा सोडवायचाय पण
त्याला व्हायचंच नाहीये मोकळ, मरू दे त्याला ….

आज मला खच्चून आलाय कंटाळा………३.

दुनियादारी शिकवणारी प्रवचन आणि
आशा दाखवणार सार तत्वज्ञान
करू काय त्याच….घालू लोणच? छे साला…

आज मला खच्चून आलाय कंटाळा………४.

ऋतू आले अन गेले, सारेच्या सारे एकसारखे….
पावसाळा काय अन काय उन्हाळा
कुठे मिळेना जीवाला गारवा, मरू दे ना….

आज मला खच्चून आलाय कंटाळा………५.

कसा जाईल हो हा कंटाळा?
काय करू काय…उपाय सांगा!
विचार तरी किती करावा…कारण त्याचाही,
आता मला खच्चून आलाय कंटाळा………..६

— शिरीन आरश

January 19, 2012 Kavita / Poems 4 Comments

काय असतात ना ही नाती……….

काय असतात ना ही नाती
काही मनापासुन जोडलेली
तरं काही सहज तोडलेली……..

काही जिवाभावने जपलेली
तर काही नुस्तीच नावापुरती उरलेली……..

काही नितळ प्रेमासाठी जगलेली
तर काही बांन्डगुळासारखी दुस-याच्या जिवावर वाढलेली……..

काही बिनधास्त सगळ्यांसमोर मांडलेली
तर काही भितीपोटी गुपितासारखी लपवलेली……..

काही मैत्रीच नाव दिलेली
तर काही त्याहीपुढील प्रेमाचा गाव असलेली……..

काहि ओझ्यासारखी वाहीलेली
तर काही आठवणींच्या ओलाव्यासारखी जपलेली……..

काहि नकळत मनाशी जुळलेली
तर काही स्वत:च अस्तिवच हरवलेली……..

काहि नुस्तीच नावपुरती ठेवलेली
तर काही उराशी जिवापाड सांभाळलेली……..

काहि मनसोक्त एकमेकांसोबत बागडलेली
तर काही मान-अपमानाच्या ओझ्याखाली दबलेली……..

काही मोत्याहुन अनमोल ठरलेली
तर काही भंगारासारखी विकाया काढलेली……..

काय असतात ना ही नाती
काही मनापासुन जोडलेली
तरं काही सहज तोडलेली…..

— Preeti…

January 19, 2012 Kavita / Poems 32 Comments

काहीजण मैत्री कशी करतात?

काहीजण मैत्री कशी करतात?

उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात गोष्टी

— Preeti…